Loading ...

शब्दांनी बरसत रहावे (मराठी कविता)

शब्दांनी बरसत रहावे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री काजल पवार यांची शब्दांनी बरसत रहावे ही कविता.

शब्दांनी बरसत रहावे (मराठी कविता)

शब्दांनी बरसत रहावे, लेखणीने चिंब भिजावे


शब्दांनी बरसत रहावे (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री काजल पवार यांची कविता ‘शब्दांनी बरसत रहावे’.



शब्दांनी बरसत रहावे
लेखणीने चिंब भिजावे
शब्द मानती सखा मजला
अन्‌ मी त्यावर प्रेम करावे

मनी साठलेले, उगा सुचलेले
शाई होऊनि शब्द उतरावे
मी सखी तुझी, तू सोबती माझा
लेखणी होऊनि तुज जिंकावे

भाव अंतरीचे तरंग उठता
गारवा शब्दांचा किनार्‍यावरी
शब्द किनारा शब्दच वारा
लेखणीला जणू मिळे सहारा

पाझरता या लेखणीतून
अनंत तुझे रूप बरसते
भाव तू खोल मनातला
अन्‌ मी तरंग बनूनि उठते

कधी कटू तर कधी गोड
शब्दा ते तुलाच जमते
लेखणी होऊन मी तर फक्त
तुझ्या आणि तुझ्यात रमते

उलगडूनी शब्दा तुजला
एकच मात्र कळते मजला
लेखणी राही रीती माझी
शब्दाविन अर्थ कसला
शब्दाविन अर्थ कसला

- काजल पवार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची