
बाप खोल शांत वाहणारा झरा आहे - (मराठी कविता) कवयित्री अपर्णा तांबे यांची कविता बाप खोल शांत वाहणारा झरा आहे.
बोलतात सगळे बापावर फार कमी लिहिलं जातं बापावर स्तुती करण्यास शब्दच नाहीत बाप एक चैतन्य मूर्ती आहे कोणालाही न दिसणार धीर आहे बाप एक आधार आहे सताड उघडे राहिलेले दार आहे बाप भीतीच्या अंधारतला दिवा आहे बाप तळपत्या उन्हातली हवेची झुळुक आहे बाप नाही लुसलुशीत साय तो दुधातला अस्सल खमंग स्वाद आहे आईचे डोळ प्रेमाचे अश्रु अन् बापाचे डोळे विश्वासाचे दवंबिंदु आहे आई झुळझुळ वाहणारी नदी बाप खोल शांत वाहणारा झरा आहे राग खोटा त्याचा अंतरिचा भाव मात्र अगदी खरा आहे