परीक्षेनंतर माझ्या मनात - मराठी कविता

परीक्षेनंतर माझ्या मनात, मराठी कविता - [Parikshenantar Majhya Manat, Marathi Kavita] शाळेला पण असेल का मन, अन्‌ काय - काय असेल त्यात साठलं.
परीक्षेनंतर माझ्या मनात
संपल्या बाबा एकदाच्या
त्या दहावीच्या परीक्षा
अन्‌ आता मगे रहिल्या
फक्त त्या खाली खोल्या

वर्षभर पाठ करुण
थकलो आम्ही धडे
आणि आता वर्गात राहिले असतील
रिकामे बेंच आणि रिकामे फळे

असाच एकदा स्वप्नात
आला माझ्या फळा
त्यालाही लागला असेल का
आम्हा सगळ्यांचा लळा

आशेने बघतात का ? माझ्याकडे
झाकलेली पुस्तके, अन्‌ संपलेल्या वह्या
मार्कलिस्ट वर, आईच्या पदरा आडून
घेतलेल्या बाबांच्या त्या सह्या
मी शाळेच्या दरातून जाताना
मागे काही तरी राहून गेल्यासारखं वाटलं
शाळेला पण असेल का मन
अन्‌ काय - काय असेल त्यात साठलं

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.