आई म्हणताच गळा भरून येतो - मराठी कविता

आई म्हणताच गळा भरून येतो, मराठी कविता - [Aai Mhanatach Gala Bharun Yeto, Marathi Kavita] आई म्हणताच गळा भरून येतो, अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो.
आई म्हणताच गळा भरून येतो - मराठी कविता | Aai Mhanatach Gala Bharun Yeto - Marathi Kavita
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

आईच्या शब्दातच माया आहे
ती मृदु मुलायम, जणु देवची काया आहे
ती पावसाची पहिली धार आहे
ती देवाच्या गळ्यातला फुलांचा हार आहे
आईच्या रुपात देव जणु वरुन येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

माझ्या डोळ्यातले अश्रु, तिच्या डोळ्यात जमा होतात
माझे सारे अपराध, तिच्या मिठीत क्षमा होतात
तिच्या पदराला नेहमी माझा गंध येतो
अन माझ्या भवती तिला आनंद येतो
एवढा मायेचा पाझर कुठून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

तिच्या प्रेमला तोड नाही
तिच्या माये एवढी कुठलीच गोष्ट गोड नाही
माला न समजनार, ती एक कोड आहे
माझ्या प्रेमात तिच मन वेड आहे
प्रेमाच्या लढाईत देव ही हारून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.