
तेव्हा माझा बाप - (मराठी कविता) डॉ. गणेश तरतरे यांची ‘बाप’ या विषयावरील अत्यंत संवेदनशील कविता.
माझे वय तेरा दिवस तेव्हा माझा बाप आम्हाला सोडून गेला का माहित नाही पण आमची आई मला दोषी ठरवतं असे... असो तिचे काही मतं, अनुभव, विश्वास असेन तरीही माझ्याशी तीने जुळवून घेतलं भावंडं नसलेला माझा मीचं मी आणि आई एव्हढाच परिवार परिवाराच्या बाहेर अख्ख वाळवंट बापाची सावली ही न पाहिलेला मी मी उन्हाळे पाहत होतो वाढत होतो, वाळत होतो बाराखडीच्या ओरखड्यात समजता होत होतो समजता समजता समज उद्विग्न करीत असे ऊन सावलीची जाणीव आता होत होती आपल्या परक्याची परिभाषा कळतं होती सर्व बापड्यांच्या बापसावल्या होत्या सटी ने माझं प्राक्तन तेजान लिहलं होत मला स्वाभिमान शिकवणारा उंच माथ्याचा भगवा बाप भेटला त्याने उन्हाची सलगी करून दिली आता, उन्ही धग मस्त वाटते
(डॉ. गणेश तरतरे हे मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)