Loading ...

सहानभूती - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची सहानभूती ही लोकप्रिय मराठी कविता.

सहानभूती - मराठी कविता (कुसुमाग्रज)

उभे भवती प्रासाद गगनभेदी...


सहानभूती - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची सहानभूती ही लोकप्रिय मराठी कविता.



उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्‍याशी गुणगुणत अन्‌ अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
हृदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोष
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येई कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी उर

म्हणे, राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओंजळीत
चालू लागे तो दिन बंधु वाट

आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात

कुसुमाग्रज यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची