माझा घोडा (मराठी कविता)

माझा घोडा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची लोकप्रिय कविता माझा घोडा.
माझा घोडा (मराठी कविता)
माझा घोडा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
माझा घोडा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची लोकप्रिय कविता माझा घोडा.

टपटप टपटप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी अपुली कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत, चाले थोडा थोडा घोडा माझा घाली रिंगण उखडून टाकी सारे अंगण कोणी त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबुक ओढा सात अरण्ये, समुद्र सात ओलांडील हा एक दमात आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा

- शांता शेळके

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.