उठा उठा चिऊताई (मराठी कविता)

उठा उठा चिऊताई - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर) यांची लोकप्रिय कविता उठा उठा चिऊताई.
उठा उठा चिऊताई (मराठी कविता)
उठा उठा चिऊताई (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
उठा उठा चिऊताई - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर) यांची लोकप्रिय कविता उठा उठा चिऊताई.

उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजुनही सोनेरी हे दूत आले घरटयाच्या दारापाशी डोळयांवर झोप कशी अजुनही लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारापाणी चिमुकल्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई उडोनीया दूर जाई भूर भूर

- कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.