विचित्र वीणा (मराठी कविता)

विचित्र वीणा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची लोकप्रिय कविता विचित्र वीणा.
विचित्र वीणा (मराठी कविता)
विचित्र वीणा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
विचित्र वीणा - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची लोकप्रिय कविता विचित्र वीणा.

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे एक त्यातले लुचे आईला सटीन कांती गोरे गोरे फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे घाटामध्ये शिरली गाडी अन्‌ रात्रीचा पडला पडदा पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

- बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.