आणि मी कचरा झालो (मराठी कविता)

आणि मी कचरा झालो (मराठी कविता) - डॉ. गणेश तरतरे यांची कविता.
आणि मी कचरा झालो (मराठी कविता)
आणि मी कचरा झालो (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
आणि मी कचरा झालो - (मराठी कविता) काही संदर्भ: म्हाताऱ्या सिंहाची अवस्ता केविलवाणी असते, त्या पेक्षा म्हाताऱ्या घोड्यांना गोळी घालतात. हे किती छान आहे; नाही का?

आणि मी कचरा झालो त्यांची गरज संपली आणि मी कचरा झालो मूल्य ना समजे माझे मलाच मी होतो त्याचा कधीतरी तेव्हा मी चलन होतो आता चालता येईना आणि मी कचरा झालो मी भाग होतो वेवस्थेचा मी वेवस्था होतो त्यांची वेवस्थित होतो आता खचलो दमलो आणि मी कचरा झालो माझ्या दिवसाची ही सायंकाल आहे का ही अगाज आहे काळाची? उजेड उदास झाला आणि ढळत्या प्रहरी मी कचरा झालो काय बरे झाले असते पक्ष्यां सारखे उडालो असतो उडता उडता खूप दूरऽऽऽ खूप दूरऽऽऽ परतीचा रस्ता देखील सापडू नये अंधारात माझा काळोख होण्यासाठी

- डॉ. गणेश तरतरे
(डॉ. गणेश तरतरे हे मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.