Loading ...

फुलपाखरे - मराठी कविता (अ. ज्ञा. पुराणिक)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अ. ज्ञा. पुराणिक यांची फुलपाखरे ही लोकप्रिय मराठी कविता.

फुलपाखरे - मराठी कविता (अ. ज्ञा. पुराणिक)

धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे


फुलपाखरे - मराठी कविता (अ. ज्ञा. पुराणिक)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अ. ज्ञा. पुराणिक यांची फुलपाखरे ही लोकप्रिय मराठी कविता.



धरू नका ही बरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ धृ.॥
काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होतां सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुन गोजिरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ १ ॥

मजेमजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ २ ॥

फुलाफुलांशी हासत खेळत
फिरती भवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ३ ॥

हात लावता पंख फाटतिल
दोरा बांधुन पायहि तुटतिल
घरी कशी मग सांगा जातिल ?
दूर तयांची घरे । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ४ ॥

उगाच धरिता त्यास कशाला?
अपाय करिता मुक्या जिवाला
आवडेल का हे देवाला?
हि देवाची मुले । फुलांवर उडती फुलपाखरे! ॥ ५ ॥

- अ. ज्ञा. पुराणिक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची