Loading ...
/* Dont copy */

पाहुणेर - मराठी कविता (पुरुषोत्तम पाटील)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या तळ्यांतल्या साउल्या या कवितासंग्रहातील पाहुणेर ही लोकप्रिय मराठी कविता.

पाहुणेर - मराठी कविता (पुरुषोत्तम पाटील)

येणाऱ्यासाठी, लगबग पहाट, चुळुक झुळूक सडा


पाहुणेर - मराठी कविता (पुरुषोत्तम पाटील)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या तळ्यांतल्या साउल्या या कवितासंग्रहातील पाहुणेर ही लोकप्रिय मराठी कविता.


शब्दार्थ:
पाहुणेर - पाहुणचार



कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या छोट्या आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या काही कवितांचा माझ्यावर फार प्रभाव पडला होता. त्यात त्यांची पाहुनेर नावाची कविता मला आठवते ज्या कवितेच्या शैलीवर आधारीत मी देखील एक कविता लिहीली होती.
- नागराज मंजुळे - चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते. (संदर्भ: नागराज मंजुळे यांची मुलाखत)


येणाऱ्यासाठी...
लगबग पहाट... चुळुक झुळूक सडा
हलकेसे स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी
अन् थोडा दळदार सूर्य

थांबलेल्यासाठी...
एकुलता पाट, सुगरण ताट
अन् नखललेल्या कोवळ्या पानांचा
थोडा बेतशीर केशरविडा

जाणाऱ्यासाठी...
अर्ध्या-उघड्या दाराआडचा
ओझरता इरकली पदर अन्
कांकणांची थोडी अस्वस्थ किणकिण...

- पुरुषोत्तम पाटील
(तळ्यांतल्या साउल्या, १९७८)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची