Loading ...
/* Dont copy */

माझा भारताचा ध्वज - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची माझा भारताचा ध्वज ही लोकप्रिय मराठी कविता.

माझा भारताचा ध्वज - मराठी कविता (कुसुमाग्रज)

माझा भारताचा ध्वज, उभा अजिंक्य आकाशी


माझा भारताचा ध्वज - मराठी कविता (कुसुमाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची माझा भारताचा ध्वज ही लोकप्रिय मराठी कविता.



माझा भारताचा ध्वज
उभा अजिंक्य आकाशी
नव्या मनूचा प्रवास
याच्या मंगल प्रकाशी

संतमुनींचा, ऋषींचा
याला आशीर्वाद मिळे
लक्ष जीवनांची ज्योत
त्याच्या पायापाशी जळे

माझ्या भारताचा ध्वज
निळ्या आकाशात डोले
उषेसंगती नक्षत्र
येथे उदयाला आले

याला अरुणदेवाने
भाळी लावले केशर
मायदेशास मिळाला
त्यात वीरतेचा वर

पूर्णचंद्राने तयास
दिले चांदणे नितळ
स्नेहशांततेची भव्य
उभी राहे दीपमाळ

सस्यशामल धरेने
दिले ऐश्वर्य मातीचे
सूर्यचक्राने अर्पिले
व्रत अखंड गतीचे

माझ्या देशाच्या दैवता
तुला सहस्त्र वंदन
तुझ्या रक्षणसेवेत
होवो कृतार्थ जीवन

- कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची