Loading ...
/* Dont copy */

अनंत तारा - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची अनंत तारा ही लोकप्रिय मराठी कविता.

अनंत तारा - मराठी कविता (बालकवी)

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात


अनंत तारा - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची अनंत तारा ही लोकप्रिय मराठी कविता.



अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत

कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी
म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा

विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी
फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी

अनंत सारे विश्व, जाहले अनंतात या लीन
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान
तव वैभव हे, तुझी धने ही, हे अत्युच्च महाल
जातिल का गगनास भेदूनी? अनंत का होतील?

तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील
ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल, कोठवरी जाईल?
मी, माझे या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची