Loading ...

जीर्ण दुर्ग - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची जीर्ण दुर्ग ही लोकप्रिय मराठी कविता.

जीर्ण दुर्ग - मराठी कविता (बालकवी)

दुर्ग भयकंर जीर्ण पसरला पढुती, जो गतकाली


जीर्ण दुर्ग - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची जीर्ण दुर्ग ही लोकप्रिय मराठी कविता.



दुर्ग भयकंर जीर्ण पसरला पढुती, जो गतकाली
शूर साहसी नरसिंहांनी अपुली वसती केली
कड्याकड्यांमधी घुमुनि नर्मदा गात यशोमय गीते
सांगत होती सर्व देशभर सद्य:कर्तव्याते

रंगमहाली शेज फुलांची याच गडावर झाली
स्वातंत्र्यास्तव अग्नी भडकला राख तयाची केली
तरवारीची धार देवता हीच जयांची एक
ब्रीद जयाचे सदा तियेला रुधिराचा अभिषेक

जीव नव्हे संसार ओतिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनी
त्या वीरांचा वास जाहला गतकाली या स्थानी
आता कोणी क्षुद्र पुजारी देविस पूजायाते
घालित बसतो कुंकुमपूरित चंदन अपुल्या हस्ते

आणि पिवोनी भांग दुखारी झिंगत वदतो काही
पुर्वकथा निर्विकार चित्ते हर्षित दोन पयाही
हे काळाचे खेळ, कुठेही असेच चालायाचे
त्यास कशाला परि आम्हाला काहि न वाटे त्याचे

एक खुराडे भाडयाचे ते राहू त्यात खुशाल
क्षुद्र जिवांना अम्हा कशाला असले रंगमहाल

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची