Loading ...

वरदविनायक श्रीगणेश महड (गणपतीच्या गोष्टी)

वरदविनायक श्रीगणेश महड (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला वरदविनायक हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

वरदविनायक श्रीगणेश महड - गणपतीच्या गोष्टी | VaradVinayak ShriGanesh Mahad - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘वरदविनायक’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


वरदविनायक श्रीगणेश महड (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘वरदविनायक’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



प्राचीन काळी कर्जत खोपोली नजिकच्या भागात घनदाट अरण्य होते. त्या घनदाट अरण्यास ‘पुष्पकवन’ असे नाव होते. या पुष्पक-भद्रक तपोवनात ‘गृत्समद’ नावाच्या एका भक्ताने श्रीगणेशाला प्रसन्न करुन घेण्यासठी कडक तपश्चर्या केली होती. त्याने ‘ॐ गं गणपतेय नमः’ हा मंत्र रचून त्याचा जप केला. त्याची कठोर तपश्चर्या पाहून श्रीगणेश प्रसन्न झाले होते व त्याच्यासमोर प्रकट होऊन त्यांनी आपल्या या भक्ताला वर दिला होता, त्यांनी ‘मी येथेच या वनात राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करीन.’ असे सांगीतले

भक्ताला दिलेल्या या वचनाप्रमाणे महड येथील तलावात विनायक श्रीगणेश गृत्समदला मूर्तीरुपाने मिळाले होते. अशा प्रकारे गणेशाने गृत्समदाला वर देऊन आपले वचन पूर्ण केले होते म्हणून ‘वरदविनायक’ स्वरुपात ते महड तीर्थक्षेत्रात स्थापन झाले.


वरदविनायक श्रीगणेश महड (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची