Loading ...
/* Dont copy */

ओझरचा विघ्नहर्ता श्रीगजानन (गणपतीच्या गोष्टी)

ओझरचा विघ्नहर्ता श्रीगजानन (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला विघ्नहर्ता श्रीगजानन हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

ओझरचा विघ्नहर्ता श्रीगजानन - गणपतीच्या गोष्टी | Vighnaharta ShriGajanan Ozar - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘विघ्नहर्ता श्रीगजानन’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


ओझरचा विघ्नहर्ता श्रीगजानन (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या अतिषय प्रिय अशा श्री गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘विघ्नहर्ता श्रीगजानन’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



फार पूर्वी हेमवती नगरीत महत्त्वकांक्षी व सत्तालोभी असा ‘अभिनंदन’ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने इंद्रपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी यज्ञ सुरू केला. यज्ञात त्याने इंद्र सोडून सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली. ही गोष्ट जेव्हा नारदाकडून इंद्रास समजली, तेव्हा इंद्र अतिशय संतापला. त्याने काळाला विघ्नासुर करुन अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यास पाठवून दिले. विघ्नासूराने अभिनंदनाच्य राज्यात खूप धुमाकूळ घातला. सगळीकडे त्याने विघ्ने आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व देव भयभीत झाले. त्यांनी गणेशयाग करून गणेशाची आराधना केली. सर्व देव गणेशास शरण आले.

तेव्हा गणेशाने सर्व देवांना अभय देऊन विघ्नासूराचा नाश करण्याचे वचन दिले.

गणेशाने काळराक्षस मायावी विघ्नासूराशी युद्ध करून त्यास जेरीस आणले. गणेशपुढे आपले काही चालत नाही हे पाहून विघ्नासूर गणेशास शरण गेला व त्याने अभय मागितले. तेव्हा गणेशाने त्याला जीवदान देऊन सांगितले, ‘जेथे जेथे माझे भक्त पूजा-अर्चा, प्रार्थना करीत असतील, तेथे तू म्हणजे काळाने कसलेही विघ्न देऊ नये. शिवाय कार्यारंभी जो माझे स्मरण करणार नाही त्याच्या कार्यातच विघ्ने आणीत जा.’

विघ्नासूराने हे मान्य केले व गणेशाकडे वर मागितला, ‘आपली आज्ञा मी सदेव पाळीन. आपल्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी. आपण माझे नाव धारण करावे.’

गणपतीला विघ्नासूर जेथे शरण आला त्या ठिकाणी देवांनी गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली आणि गजाननाने ‘विघ्नराज-विघ्नहर्ता’ हे नाव धारण केले. पुणे जिल्ह्यात ओझर येथे विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे हे स्थान अष्टविनायकांमध्ये प्रसिद्ध स्थान आहे.


ओझरचा विघ्नहर्ता श्रीगजानन (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची