Loading ...

गणपतीचे वाहन उंदीर झाला (गणपतीच्या गोष्टी)

गणपतीचे वाहन उंदीर झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाचे वाहन उंदीर कसा झाला असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपतीचे वाहन उंदीर झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganpatiche Vahan Undir - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाचे वाहन उंदीर कसा झाला असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपतीचे वाहन उंदीर झाला (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल त्याची ही गोष्ट.



मुलांनो, गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविल्यावर उंदरासाठी करंजी द्यावी लागते. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल? याचीच ही कथा.

एकदा इंद्रसभेत समारंभात गाणे गाण्यासाठी इंद्राने क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीचे बोलावणे केले. तेव्हा घाईघाईन इंद्रसभेत येत असता या क्रौंच गंधर्वाची लाथ तेथेच बसलेल्या बामदेव नावाच्या महर्षीला बसली त्यामुळे बामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, ‘तू तुरुतुरु पळणारा उंदीर होशील.’ त्याच्या शापने क्रौंचाचे उंदरात परिवर्तन झाले आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.

या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करण्यास सुरूवात सुरुवात केली. आश्रमतले पदार्थ खाऊन त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. एवढेच नाही तर आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. आश्रमातील साऱ्या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जंगजंग पछाडले. पण छे! कोणाच्याच श्रमांना यश येत नव्हते.

शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’

गणपतीने मग तेथे प्रकट होऊन युक्तीने आपल्या पाश त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा उन्मत्त्पणा अजूनही ओसरला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘तुझ्याकडून मला कोणताही वर नको. तूच माझ्याकडे वर माग.’ त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती लगेच म्हणाले, ‘बरं, आजपासून तू माझे वाहन हो.’ आणि गणपती त्याचवेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला.

गणपतीचे वाहन उंदीर झाला (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची