Loading ...
/* Dont copy */

गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक (गणपतीच्या गोष्टी)

गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक (गणपतीच्या गोष्टी) - आपला लाडका बाप्पा महर्षी व्यासांचा लेखनिक कसा झाला? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक - गणपतीच्या गोष्टी | Ganpati Maharshi Vyasancha Lekhanik - Ganpati Stories

आपला लाडका बाप्पा महर्षी व्यासांचा लेखनिक कसा झाला? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, व्यासमहर्षी महाभारत कथन करीत असता ते लिहून घेण्याचे कार्य गणपती बाप्पाने कसे केले त्याचीच ही गोष्ट.



महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिले हे आपल्याला माहीत आहेच. पण व्यासमहर्षी महाभारत कथन करीत असता ते लिहून घेण्याचे कार्य गणपतीने केले होते हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे.

पण जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचे ठरविले तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करुन एकट्याने लिहून काढणे आपणास शक्य नसल्याचे त्यांना जाणवले. तसेच सर्व देवांमध्येही त्यांना तोडीचा लेखनिक कोणीच आढळेना. मग महर्षी व्यास ब्रह्मदेवाकडे गेले.

ब्रह्मदेवांना महर्षी व्यास म्हणाले, ‘हे देवाधिदेव! मी माझ्या जीवनातल्या अनुभवावर आधारित महाभारत ग्रंथ लिहिण्याचे ठरविले आहे. परंतु विचार करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ते लिहून काढणे मला एकट्याला शक्य नाही. तेव्हा मला मी सांगितलेले समजून घेऊन प्रत्येक श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजावून लिहिणारा लेखनिक सहाय्यक म्हणून हवा आहे.’

हे ऐकून ब्रह्मदेव महर्षीव्यासांना म्हणाले, हे महामुनी! तुमचा ‘महाभारत’ लिहिण्याचा संकल्प स्तुत्यच आहे. तुम्ही हे सुंदर कार्य लवकरच पूर्ण कराल, अशी माझी खात्री आहे आणि तुमचे हे लेखनकार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसतीपुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून तुम्ही गणेशासच तुमच्या या कार्यासाठी तयार करा.

ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले व त्यास विनंती करून म्हणाले, ‘हे गणेशा! ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या ‘महाभारत’ लेखनकामी तुम्ही मला सहाय्य करावे अशी माझी इच्छा आहे.’

व्यासांचे म्हणणे ऐकून गणेश त्यांना म्हणाला, ‘महर्षी, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण माझीसुद्धा एक अट आहे.’ तेव्हा व्यासांनी विचारले, ‘कोणती अट?’

तेव्हा गणेशाने महर्षी व्यासांना आपली अट सांगितली, ‘मी लिहिताना तुम्ही न थांबता कथन करावे. जर तुम्हीमध्येच थांबलात तर माझी एकाग्रता भंग होईल. तसेच मध्ये वेळ दवडणेसुद्धा मला आवडणार नाही. मध्येच माझी एकाग्रता भंग झाल्यास मी माझ्या कामात एकसूत्रता आणू शकणार नाही. तुम्हाल जर असे न थांबता सतत सांगता येत असेल तरच मी तुमचा लेखनिक होण्यास तयार आहे.

महर्षी व्यासांची गणेशाची अट मान्य केली आणि म्हणाले, ‘हे विघ्नहर्त्या! मला तुमची अट मान्य आहे. पण तूसुद्धा मी जे जे काही सांगेन ते अर्थ समजल्याशिवाय लिहायचे नाहीस. प्रत्येक श्लोकाचा अर्थ प्रथम नीट समजून घेऊन लिहिणे हे महाभारत लेखनाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजल्यावाचून लिहिणे हे कदापिही शक्य आणि योग्य होणार नाही.’

गणेशानेही महर्षी व्यासांचे म्हणणे मान्य केले. मग महर्षींनी कथानकास सुरुवात केली. प्रत्येक श्लोक सांगितल्यावर वेदव्यास गोष्ट सांगत व गणेश ती लिहून काढीत असे. महाभारत कथन करता करता व्यासांच्या लक्षात आले की गणेश अर्थ समजून घेऊनही खूपच जलद गतीने लिहू शकतो आहे. तेव्हा त्यांनी अधिकाधिक कठीण व गहन श्लोक सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचा अर्थ समजून घेऊन लिहिण्यास गणेशास जास्त वेळ लागू लागला. तेवढ्या वेळात मग महर्षीव्यास नवीन श्लोक रचून तयार ठेवत. अशा प्रकारे महाभारत सहजतेनेपूर्ण झाले आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो.

गणपती महर्षी व्यासांचा लेखनिक (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची