Loading ...
/* Dont copy */

गणपती मयुरेश्वर झाला (गणपतीच्या गोष्टी)

गणपती मयुरेश्वर झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ‘मयुरेश्वर’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गणपती मयुरेश्वर झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganpati Mayureshwar Jhala - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘मयुरेश्वर’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


गणपती मयुरेश्वर झाला (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘मयुरेश्वर’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



एकदा शेष वासुकी परिवारासह पाताळामध्ये बसला असता सर्व सर्पाची माता कटू तेथे आली आणि आपल्या पुत्रांना म्हणाली, ‘तुमची सावत्र माता विनता हिच्या भेटीस मी गेले असता तिने दुर्भाषणे करुन माझा अपमान केला. त्यामुळे मला मरणप्राय यातना झाल्या. जर तुम्ही खरोखरच पराक्रमी असाल तर तिच्यावर सूड उगवा अन्यथा मला जीव देण्यावाचून गत्यंतर नाही.’

मातेचे हे भाषण ऐकून शेषाला राग आला. त्याने वासुकीला सैन्यासह विनतेला बांधून शेषापाशी आणिले. तेव्हा विनतेने आपला पुत्र गरुडाचे स्मरण केले. गरुडाचे स्मरण करताच गरुड श्येन, संपत्ती, जटायू या आपल्या बंधूसह मातेच्या सहाय्यार्थ सर्पाबरोबर लढण्यासाठी आले. पण त्याचा सर्पानी पराभव केला. तेव्हा गरुडाने सूक्ष्म रुप धारण केले आणि विनतेला घेऊन कश्यपाच्या आश्रमात पळून आला.

आश्रमात आल्यावर विनतेने आपला पती कश्यप याला हे सर्व वर्तमान कथन केले. तेव्हा कश्यप विनतेस म्हणाला. ‘भिऊ नका! तुला पुनः गर्भ प्राप्त होईल. त्यावेळी एक अंडे तुला प्राप्त होईल. ते जेव्हा गजानन फोडील, तेव्हा त्यातून उत्पन्न होणाऱ्या पक्षाच्या केवळ शब्दानेच सर्पाचा पराभव होईल! हा पक्षी गजाननाचे वाहन होईल.

हे ऐकून विनतेला आनंद झाला. कालांतराने विनतला गर्भ राहून तिने एक अंडे घातले. ते मातीमध्ये सुरक्षित ठेवले.

पुढे एक दिवस विनता आपले अंडे उबवीत व त्याचे रक्षण करीत बसली असता गणपती एका दैत्याचा पाठलाग करीत तेथे आला. त्या दैत्याला आपल्या पाशाने मारल्यावर विनतेचा डोळा चुकवून त्याने ते अंडे फोडले. त्याबरोबर त्यातून एक प्रचंड पक्षी (मोर) बाहेर आला आणि तो गणपतीशी युद्ध करू लागला. त्यावेळी गणपतीने आपली चारही आयुधे त्याच्यावर सोडली, तरी त्यांना न जुमानता त्या पक्षाने आकाशात उड्डाण करून गणपतीवर झेप घातली. तोच गणपती चपळाईने झेप घेऊन त्या पक्षाच्या पाठीवर बसला.

एव्हाना विनतेला पूर्वी झालेला कश्यपऋषीबरोबरचा संवाद आठवला. तिने गणपतीला ओळखले व म्हणाली, ‘देवाधिदेवा, ज्याअर्थी तू हे अंडे फोडलेस, त्याअर्थी हा पक्षी तुझे वाहन होईल. सर्पाचा संहार करून हा पक्षी माझ्या पुत्रांना शेषाच्या बंदीवासातून मुक्त करील, असे माझ्या पतीचे भविष्य आहे. तेव्हा हे गणेशा, तू याला साह्य करुन कार्य सिद्धीस ने आणि याच्या नामासह तुझा उच्चार लोकांनी करावा, असा याला वर दे’

विनतेच्या इच्छेप्रमाणे गणपतीने तिला वर दिले आणि यापुढे विनतेचा बालक ‘मयुरेश्वर’ या नावाने ओळखला जाईल असा वर दिला. तेव्हापासून मोर गणपतीचा वाहन झाला. मग गणेशाने मयुरावर बसून पाताळात जाऊन विनतापुत्रांची शेषाच्या बंदीवासातून मुक्तता केली. याच मोरावर बसून गणपतीने सिंदुराचा पराभव केला व आपल्या ‘मयुरेश्वर’ अवताराची समाप्ती करताना आपला बंधू कार्तिकेयास आपले वाहन मोर देऊन त्याचेही नाव मयुरेश्वर असे ठेवले.

गणपती मयुरेश्वर झाला (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची