Loading ...
/* Dont copy */

श्रीगणेशाला गजासुराचे मस्तक (गणपतीच्या गोष्टी)

श्रीगणेशाला गजासुराचे मस्तक (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला हत्तीचे तोंड कसे असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

श्रीगणेशाला गजासुराचे मस्तक - गणपतीच्या गोष्टी | Shri Gajananacha Janma - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला हत्तीचे तोंड कसे असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


श्रीगणेशाला गजासुराचे मस्तक (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना गजासुराचे म्हणजे हत्तीचे मस्तक (तोंड) कसे लागले त्याचीच ही गोष्ट.



एकदा पार्वती आपल्या स्नानगृहात स्नान करीत होती. इतक्यात शंकर तेथे अचानक आले. त्यांना पाहताच पार्वती अतिशय संकोचली. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी काय बरे करावे? अशा विचारात ती असताना तिच्या सख्यांनी तिला सुचविले की, ‘फक्त तुझीच आज्ञा पाळील असा द्वारपाल तू स्नानगृहाच्या द्वारावर ठेव.’ हा सल्ला पार्वतीला पटला.

मग पार्वतीने आपल्या अंगाला लावलेल्या उटण्यापासून, अंगच्या मळीपासून एक मूर्ती तयार केली आणि आपल्या मंत्रसामर्थ्याने तिने ती मूर्ती सजीव केली. त्याला आपला द्वारपाल नेमले व आपल्या आज्ञेशिवाय कोणासाठी स्नानगृहात प्रवेश देऊ नये असे बजावून स्नानगृहाच्या द्वारावर उभे केले.

पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे हा द्वारपाल द्वारावर उभा राहून जो येईल त्याला अडवू लागला. एकदा साक्षात शंकरच द्वारावर आले व आत जाण्यासाठी या छोट्या द्वारपालाची अनेक आर्जवे करु लागले. परंतु तो काही शंकराच्या विनंती-आर्जवांना वधला बधला नाही. त्याचे आपले एकच, ‘माता पार्वती स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही.’

शेवटी शंकरच ते! आधीच त्यांच्या नाकावर रागाची कायम वस्ती, त्यात त्यांच्याच घरात कोणी एक नखाएवढा द्वारपाल त्यांना आत जाण्यास नकार देतो हे पाहून ते अतिशय क्रुद्ध झाले. त्या रागातच त्यांनी आपल्या त्रिशुळाने द्वारपालाचा शिरच्छेद केला. त्याबरोबर त्या छोट्या द्वारपालाचे डोके आकाशात उडून गेले आणि धड जमिनीवर कोसळले.

थोड्या वेळाने पार्वती स्नान आटोपून बाहेर आली. तिच्या या द्वारपालाचे शिरविरहीत धड गतप्राण होऊन पडलेले पाहून पार्वती खूपच संतापली आणि सर्व त्रैलोक्यच भस्म करण्यास निघाली.

ते पाहून सर्व देव घाबरले. शंकराची विनवणी करु लागले. तेव्हा शंकराने आपल्या गणांना शिर शोधण्यास सांगितले. पण सर्वत्र शोधूनही शिर काही सापडेना. शेवटी शंकरांनी आपल्या गणांस आज्ञा केली की, ‘जो प्राणी तुम्हाला प्रथम दिसेल त्याचे शिर कापून आण.’

शिष्यपण शिर शोधण्यास निघाले. त्याचवेळी गजासूर नावाचा राक्षस देवांना त्रास देण्यासाठी कैलासाच्याच दिशेने येत होता. त्याचे शरीर मानवाचे आणि मस्तक हत्तीचे होते. त्याला पाहताच शंकराने त्याचे मस्तक कापले आणि ते त्या द्वारपालाच्या पदावर ठेवून आपल्या मंत्रसामर्थ्याने त्याला जिवंत केले.

पार्वतीने या गजवदनालाच आपला पुत्र मानले आणि शंकराने त्याला आपल्या गणाचे अधिपत्य दिले. तसचे त्यांनी ह्या गजवदनाला ‘गणेश’ हे नाव दिले. कार्यारंभी त्याचे स्मरण केल्यावर ती निर्विघ्न सिद्धीस जातील असा शंकरांनी त्या नावाला आशिर्वाद दिला.

आणि अशा तर्‍हेने पार्वतीने आपल्या मळीपासून तयार केलेल्या पुतळ्याचा ‘गजानन’ ‘गणपती’ झाला आणि सर्वत्र वंदनीय झाला.

श्रीगणेशाला गजासुराचे मस्तक (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची