Loading ...

पालक मका पराठा (पाककृती)

पालक मका पराठा, पाककृती - [Palak Maka Paratha, Recipe] मुलांना शाळेत डब्याला देता येण्यासाठी तसेच न्याहारीत खाल्ला जाणारा पौष्टिक पालक मका पराठा.

पालक मका पराठा- पाककला | Palak Maka Paratha - Recipe

मुलांना डब्यासाठी तसेच न्याहरीला खाता येणारा पौष्टिक तसेच चटपटीत पदार्थ पालक मका पराठा


पालक मका पराठा (पाककृती) - (Palak Maka Paratha Recipe) रोज रोज डब्याला काय द्यावे हा आयांना पडलेल्या प्रश्नावर पालक मका पराठा हा चांगला पर्याय आहे. अशा प्रकारच्या पराठ्यामधून मुलांना पालेभाज्या खावू घालता येतील. तसेच न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत पौष्टिक असा पालक मका पराठा खाल्ला जाऊ शकतो.

Palak Maka paratha is can be a good breakfast as well as in a tiffin for children. It is a healthy food.



पालक मका पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २ कप मक्याचे पीठ
  • २ वाट्या बारीक चिरलेला पालक
  • १ चमचा किसलेले आलं
  • १/२ चमचा बारीक चिरलेली मिरची
  • १ चमचा बारीक चिरलेला कांदा
  • १ चमचा ओवा
  • मीठ आवश्यकतेनुसार

पालक मका पराठा करण्याची पाककृती


  • एका परातीत मक्याचे पीठ घ्यावे.
  • मक्याच्या पीठात बारीक चिरलेला पालक, किसलेले आलं, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, ओवा, चवीनुसार मीठ टाकावे.
  • सर्व साहित्य मिसळून मिश्रण एकजीव करावे.
  • पीठ मळून झाल्यावर २ चमचे तेल टाकावे व गोळा पुन्हा मळून घ्यावा.
  • ५ ते १० मिनीटे हा गोळा झाकून ठेवावा.
  • १० मिनिटानंतर पुन्हा मळून घ्यावा व त्याचे चपातीएवढे किंवा थोडे मोठे गोळे करावे.
  • गोळ्याचा थोडासा जाडसर पराठा लाटावा.
  • आता गॅसवर तवा गरम करून तयार पराठा खरपूस भाजावा.
  • तयार आहे पालक मका पराठा.
  • पराठ्यावर बटर, चीझ किंवा मेयॉनिज लावून मुलांना द्यावा.
  • पालक मका पराठा मुलांना नक्की आवडेल.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची