Loading ...

बटाटा वडा (पाककृती)

बटाटा वडा, पाककृती - [Batata Vada, Recipe] न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन चटपटीत पदार्थ बटाटा वडा.

बटाटा वडा (पाककृती) - पाककला | Batata Vada - Recipe

अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन चटपटीत पदार्थ बटाटा वडा


बटाटा वडा (पाककृती) - (Batata Vada Recipe) आपल्या महाराष्ट्रातील मुंबईच्या रस्त्यापासुन ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कॄतीचा एक अविभाज्य भाग असणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीय पदार्थ ‘बटाटा वडा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाणारा अतिशय लोकप्रिय पदार्थ म्हणून बटाटे वड्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल.

Batata Vada is the most famous street food items in Mumbai, Maharashtra. This pure Maharashtrian Food is can be a good breakfast as well as a mid time food.



बटाटा वडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • अर्धा किलो बटाटे
  • ४ हिरव्या मिरच्या
  • कढी पत्ता
  • २ चमचे मोठे कापलेली कोथींबीर
  • अर्धा चमचा मोहरी
  • पाव चमचा हिंग
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा तेल
  • १ लिंबू
  • मीठ
  • १ कप बेसन
  • १/२ चमचा धणा पावडर
  • चिमुटभर सोडा
  • तळण्यासाठी तेल

बटाटा वडा करण्याची पाककृती


  • बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा.
  • आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.
  • एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका.
  • आता कुस्करलेले बटाटे मिसळून चांगले हलवा.
  • थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. गॅसवरून उतरून घ्या.
  • थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा.
  • आता एका भांड्यात बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशीसारखे पीठ (भजीला बनवतो तसे) बनवा.
  • जाडसर लापशी तयार झाल्यावर गॅसवर तळण्यासाठी तेल गरम करा.
  • तयार बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा.
  • सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व पावासोबत गरम-गरम वाढा.
  • खोबऱ्याची सुकी किंवा ओली चटणी पावामध्ये टाकून चटपटीत तिखट वडापाव खाण्यास तयार...!



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची