किती तरी दिवसात (मराठी कविता)

किती तरी दिवसात - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर यांची लोकप्रिय कविता किती तरी दिवसात.
किती तरी दिवसात (मराठी कविता)
किती तरी दिवसात (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
किती तरी दिवसात - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर यांची लोकप्रिय कविता किती तरी दिवसात.

किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्यांची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाऊन निर्भय गावाकडच्या नदीत होऊन मी जलमय आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पार्‍याचा बरी तोतया नळाची शिरी धार सुखी ऋचा

- बा. सी. मर्ढेकर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.