तिखट चिरोटे - पाककृती

तिखट चिरोटे, पाककला - [Tikhat Chirote, Recipe].
तिखट चिरोटे - पाककृती | Tikhat Chirote - Recipe

तिखट चिरोटे


तिखट चिरोटेतिखट चिरोटे करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ३ वाट्या मैदा
 • १ डाव तुपाचे मोहन
 • १ चमचा जिरेपूड
 • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • ८ - १० हिरव्या मिरच्या
 • मीठ

साठा करण्याची पाककृती


 • १ डाव तूप फेसून त्यात तांदळाचे पीठ घालून साठा तयार करावा.

तिखट चिरोटे करण्याची पाककृती


 • हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या.
 • नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
 • तासाभराने पीठ कुटून घ्या व त्याच्या पोळ्या लाटा.
 • नेहमीप्रमाणे पोळीला साठा लावून त्यावर दुसरी पोळी घाला.
 • त्यावर पुन्हा साठा लावून तिसरी पोळी घाला व गुंडाळी करून ठेवा.
 • नंतर त्याचे तुकडे कापून चिरोट्याप्रमाणे लाटून तळा.

तिखट चिरोटे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.