सुक्या खोबर्‍याच्या करंज्या - पाककृती

सुक्या खोबर्‍याच्या करंज्या, पाककला - [Sukya Khobaryachya Karanjya, Recipe].
सुक्या खोबर्‍याच्या करंज्या - पाककृती | Sukya Khobaryachya Karanjya - Recipe

सुक्या खोबर्‍याच्या करंज्या


सुक्या खोबर्‍याच्या करंज्यासुक्या खोबर्‍याच्या करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी बारीक रवा
 • २ वाट्या मैदा
 • २ चमचा डालडा
 • दुध
 • चवीनुसार मीठ

सारणासाठी लागणारा जिन्नस


 • २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा कीस
 • सव्वा वाटी पिठीसाखर
 • थोडासे बेदाणे, चारोळी
 • ५ - ६ वेलदोड्याची पूड
 • ३ चमचा खसखस
 • अर्धी वाटी कणीक

साठ्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ चमचा कॉर्नफ्लोअर
 • १ चमचा घट्ट डालडा

सुक्या खोबर्‍याच्या करंज्या करण्याची पाककृती


 • प्रथम खोबरे घालून घ्या व हाताने चुरा.
 • खसखस भाजून पूड करावी.
 • थोड्या तुपावर कणीक भाजून घ्यावी.
 • नंतर सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे.
 • रवा, मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून दूधाने घट्ट पीठ भिजवावे.
 • २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे.
 • अर्ध्या पिठात लाल किंवा केशरी रंग घालावा.
 • नंतर त्याच्या पोळ्या लाटाव्या.
 • मध्ये साठा लावून एकमेकावर तीन पोळ्या पसराव्या.
 • मधली पोळी वेगळ्या रंगाची ठेवावी.
 • नंतर गुंडाळी करून कापाव्या.
 • प्रत्येक तुकड्याची अलगद पुरी लाटावी.
 • त्यात तयार सारण भरून करंजी करावी.
 • कातण्याने कापून घ्यावी.
 • थोड्या करंज्या तयार करून बेताच्या विस्तवावर तळाव्यात.

सुक्या खोबर्‍याच्या करंज्या

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.