न तळता खव्याच्या करंज्या
न तळता खव्याच्या करंज्या
न तळता खव्याच्या करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ५०० ग्रॅम खवा
- १ वाटी पिठी साखर
- ५ - ६ वेलदोड्यांची पूड
- २ चमचा चारोळी
- १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
न तळता खव्याच्या करंज्या करण्याची पाककृती
- खवा हाताने सारखा करावा व थोड्या तुपावर भाजून घ्या.
- २ चमचा पिठीसाखर बाजूला करून उरलेली साखर खव्यात मिसळावी.
- त्यातच वेलची पूड घालावी.
- चारोळी तव्यावर सुकीच भाजून घ्या.
- खोबरे कीस भाजून घ्यावा.
- निवल्यावर हाताने चुरून घ्यावा.
- चारोळी, खोबरे व शिल्लक पिठीसाखर एकत्र करून सारण तयार करावे.
- खव्याचा लिंबाएवढा गोळा प्लॅस्टिकवर पुरीप्रमाणे थापावा.
- त्यावर थोडे सारण घालून करंजी बंद करावी.
- कडेने मुरड घालावी.
- करंजीचा साचा असल्यास त्यात घालून करावी.
- खव्याच्या करंज्या तळायच्या नाहीत.
न तळता खव्याच्या करंज्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला