कोकोच्या आंबट गोड वड्या
कोकोच्या आंबट गोड वड्या
कोकोच्या आंबट गोड वड्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- चार वाट्या दही
- ३ वाट्या साखर
- २ मोठे चमचे कोको
- १॥ चमचा मीठ
- १ चमचा काजू काप
- ४ वेलदोडे पूड किंवा १ चमचा व्हॅनिला इसेन्स
- अर्धी वाटी पीठी साखर
कोकोच्या आंबट गोड वड्या करण्याची पाककृती
- दही फडक्यावर ओतून चार - पाच तास टांगून ठेवावे.
- त्यातले पाणी निथळून गेले की चक्का एका कल्हईच्या मोठ्या पातेल्यात काढून घ्यावा.
- चक्क्यात साखर, मीठ, कोको व खोबरे घालून एकत्र करावे व गॅसवर मिश्रण सतत घोटावे.
- घट्ट होऊन गोळा होऊ लागला की पिठीसाखर घालून खाली उतरावे व घोटावे.
- त्यात वेलचीपूड किंवा इसेन्स घालून तूपाचा हात फिरवलेल्या ट्रे अगर ताटात मिश्रण थापावे.
- काजूचे काप वरून खोचावे.
- वाटी तळाला तूप लावावे व मिश्रणाचा पृष्ठभाग सारखा करावा.
- गार झाल्यानंतर वड्या कापाव्या.
कोकोच्या आंबट गोड वड्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला