सायीचे गुलाबजाम - पाककृती

सायीचे गुलाबजाम, पाककला - [Sayiche Gulabjam, Recipe].
सायीचे गुलाबजाम - पाककृती | Sayiche Gulabjam - Recipe

सायीचे गुलाबजाम


सायीचे गुलाबजामसायीचे गुलाबजाम करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी घट्ट साय
 • अर्धी वाटी मैदा
 • चिमूटभर खायचा सोडा
 • २० - २५ बेदाणे
 • दीड वाटी साखर
 • अर्धा चमचा रोझ इसेन्स किंवा ४ - ५ वेलदोड्यांची पूड
 • तळण्यासाठी तूप

सायीचे गुलाबजाम करण्याची पाककृती


 • परातीत साय काढावी.
 • परात तिरकी करून त्याखालचे दूध काढून बाजूला करा.
 • नंतर सायीत मैदा व खायचा सोडा घालून हलक्या हाताने मिश्रण करा.
 • त्याचे सुपारीएवढे गोळे करा.
 • गोळे वळताना आत एकेक बेदाणा घालावा.
 • कोरडा मैदा हाताला लावून ४ - ५ गुलाबजाम करा.
 • तळून घ्या व पाकात टाका.
 • साखरेत सव्वा वाटी पाणी घालून एकतारी पाक करा.
 • त्यात रोझ इसेन्स किंवा वेलचीपूड घाला.
 • तूपात गुलाबजाम तळून घ्या.
 • तळलेले गुलाबजाम पाकात टाका.
 • गुलाबजाम पाकात टाकताना पाक गरम असावा.
 • पहिले तळून होईपर्यंत दुसरे ४ - ५ गुलाबजाम तळून घ्यावे.

सायीचे गुलाबजाम

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.