नवरत्न चिवडा - पाककृती

नवरत्न चिवडा, पाककला - [Navratna Chivda, Recipe].
नवरत्न चिवडा - पाककृती | Navratna Chivda - Recipe

नवरत्न चिवडा


नवरत्न चिवडानवरत्न चिवडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी मूग
 • १ वाटी मसूर
 • १ वाटी चणे
 • १ वाटी मटकी
 • १ वाटी हिरवे वाटाणे
 • १ वाटी मूग डाळ
 • १ वाटी चणा डाळ
 • १ वाटी बटाटा किस (वाळवलेला)
 • १ वाटी जाड पोहे
 • अर्धी वाटी काजू वाटी
 • १ वाटी शेंगदाणे
 • तिखट
 • मीठ
 • चवीपुरते सायट्रीक अ‍ॅसिड किंवा आमचूर पावडर
 • पिठीसाखर
 • तेल
 • खायचा सोडा

नवरत्न चिवडा करण्याची पाककृती


 • सर्व डाळी आणि कडधान्ये रात्रभर सोड्याच्या पाण्यात भिजवावीत.
 • सकाळी उपसून चाळाणीत ठेवावी.
 • पातळ कपड्यावर सावलीत वाळावावी.
 • गरम तेलात पोहे तळायची गाळणी ठेवून बटाटा किस, जाड पोहे, काजू, शेंगदाणे सर्व तळून घ्यावेत.
 • नंतर कडधान्ये व डाळी तळाव्यात.
 • सर्व साहित्य एकत्र करुन तिखट, मीठ, आमचूर किंवा सायट्रीक अ‍ॅसिड घालून ढवळावे.
 • शेवटी पिठीसाखर घालावी.
 • नवरत्न चिवडा रंगीबेरंगी दिसतो.
 • चवीला छान लागतो.

नवरत्न चिवडा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.