तळलेल्या पोह्यांचा चिवडा - पाककृती

तळलेल्या पोह्यांचा चिवडा, पाककला - [Talalelya Pohyancha Chivda, Recipe].
तळलेल्या पोह्यांचा चिवडा - पाककृती | Talalelya Pohyancha Chivda - Recipe

तळलेल्या पोह्यांचा चिवडा


तळलेल्या पोह्यांचा चिवडातळलेल्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • पाव किलो जाडे पोहे
 • १ वाटी भाजून सोललेले दाणे
 • १ वाटी खोबऱ्याचे पातळ काप
 • ८-१० हिरव्या मिरच्या
 • २ मोठे कांदे
 • थोडासा कढिलिंब
 • रंगासाठी थोडे तिखट
 • मीठ
 • साखर
 • हळद

तळलेल्या पोह्यांचा चिवडा करण्याची पाककृती


 • पोहे एका ताटात घ्या.
 • त्याला अर्धा कप दूध व थोडे पाणी लावून तासभर बाजूला ठेवावे.
 • कांदे किसून व पिळून पाणी काढून टाका.
 • मिरच्या काढा.
 • कढईत तेल घालून प्रथम दाणे, खोबऱ्याचे काप तळावे.
 • मोठ्या गाळण्यातून पोहे तळावे.
 • कढिलिंब तळावा.
 • शेवटी कांद्याचा कीस तळावा.
 • लालसर व अगदी कुरकुरीत झाला पाहिजे.
 • नंतर सर्व एकत्र करून त्यावर तिखट, मीठ, साखर, हळद, घालून कालवावे.

तळलेल्या पोह्यांचा चिवडा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.