दाण्याचे लाडू - पाककृती

दाण्याचे लाडू, पाककला - [Danyache Ladoo, Recipe].
दाण्याचे लाडू - पाककृती | Danyache Ladoo - Recipe

दाण्याचे लाडू


दाण्याचे लाडूदाण्याचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २५० ग्रॅम शेंगदाणे
 • २५० ग्रॅम साखर
 • अर्धा नारळ
 • ५ - ६ वेलदोड्यांची पूड
 • थोडा केशरी रंग
 • पाव वाटी तूप

दाण्याचे लाडू करण्याची पाककृती


 • दाणे भाजून सोलावे व त्याची जाडसर पूड करावी.
 • नंतर थोड्या तुपावर दाण्याचे कुट, बेसन भाजतो त्याप्रमाणे भाजावे.
 • खोबऱ्याचा चव नुसताच परतून घ्या.
 • साखरेत पाणी घालून दोनतारीपेक्षा जरा जास्त पाक करा.
 • पाकात रंग घाला.
 • त्यात दाण्याचे कुट, खोबरे, वेलदोड्याची पूड घालून ढवळा.
 • थोड्या वेळाने मिश्रण निवले की लाडू करा.

दाण्याचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.