मोरावळा
आवळ्याचा एकतरी पदार्थ जेवणामध्ये नेहमी असावा, त्यामुळे शरीरातील लोहाचे पोषण वाढते.
मोरावळा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- एक किलो मोठे पिवळसर ताजे आवळे
- दोन किलो साखर
- स्वादासाठी वेलची पावडर
मोरावळा करण्याची पाककृती
- प्रथम आवळे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्या व चाळणीत ठेवा.
- नंतर स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा.
- पुसल्यानंतर त्यांना टोकदार टोचण्याने प्रत्येक आवळा टोचून स्वच्छ पाण्यात टाका.
- टोचणे नसल्यास चाकूच्या टोकाने अथवा विणायच्या सुईने टोचा.
- टोचलेले आवळे तसेच पाण्यात चार तास ठेवा.
- नंतर आवळे चाळणीत काढून त्याच पाण्यात साखर टाकून पाक करा.
- पाकावर मळी आल्यास काढून टाका.
- साधारण जाडसर पाक झाला की त्यात आवळे टाका व दहा मिनीटे उकळवा.
- ते तसेच गार होऊ द्या.
- दुसर्या दिवशी मिश्रण पुन्हा दोन तारी पाक होईपर्यंत उकळवा.
- आवळे पाकात मुरुन खाली बसतील.
- थंड झाल्यावर वेलची पावडर टाका.
- गार झाल्यानंतर बरणीत भरा.
मोरावळा
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला