मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर - पाककृती

मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर, पाककला - [Mod Aalelya Mugachi Koshimbir, Recipe].
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर - पाककृती | Mod Aalelya Mugachi Koshimbir - Recipe

मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर


मोड आलेल्या मुगाच्याऐवजी तुम्ही कुठलीही मोड आलेली कडधान्ये वापरून अश्याप्रकारे कोशिंबीर करु शकता.मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी मोड आलेले मूग
 • एक कांदा
 • एक टोमॅटो
 • दोन हिरव्या मिरच्या
 • पाव वाटी किसलेले खोबरे
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • अर्धे लिंबू

मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर करण्याची पाककृती


 • मोड आलेले मूग एका भांड्यात घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा व टोमॅटो टाका.
 • चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाका.
 • चवीनुसार मीठ व लिंबाचा रस टाकून चांगले एकत्र करा.
 • यावर किसलेले ओले खोबरे टाका.
 • तयार आहे मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर.

मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.