मोड आलेल्या मुगाचे धिरडे
लोहयुक्त असलेल्या मुगाच्या धिरड्यासोबत पुदिन्याची चटणी खाल्ली असता शरीरातील लोहाचे पोषण वाढते.
मोड आलेल्या मुगाचे धिरडे करण्यासाठी लागणारा जिन्नस
- एक वाटी मोड आलेले मूग
- ३ - ४ हिरव्या मिरच्या
- एक छोटा चमचा जीरे
- चवीनुसार वाटलेले लसूण
- चवीनुसार मीठ
मोड आलेल्या मुगाचे धिरडे करण्याची पाककृती
- मोड आलेले मूग, हिरव्या मिरच्या आणि जीरे बारीक वाटा.
- त्यात वाटलेले लसूण व चवीनुसार मीठ घाला.
- मिश्रण थोडे पातळ बनवा.
- गरम तव्यावर थोडे तेल टाकल्यानंतर मिश्रण टाकून पातळ धिरडे बनवावे.
- धिरडे मंद गॅसवर खरपूस भाजा.
- मोड आलेल्या मुगाचे धिरडे आवळ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या.
मोड आलेल्या मुगाचे धिरडे
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला