मोड आलेल्या मसुराचा पुलाव - पाककृती

मोड आलेल्या मसुराचा पुलाव, पाककला - [Mod Aalelya Masuracha Pulao, Recipe].
मोड आलेल्या मसुराचा पुलाव - पाककृती | Mod Aalelya Masuracha Pulao - Recipe

मोड आलेल्या मसुराचा पुलाव


‘क’ जीवनसत्वयुक्त लिंबू, कोथिंबीर यासारखे पदार्थ असल्यामुळे हा पुलाव सर्वच दृष्टीने पौष्टिक असतो.मोड आलेल्या मसुराचा पुलाव करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी तांदूळ
 • अर्धी वाटी मोड आलेले मसूर
 • अर्धी वाटी कापलेले गाजराचे पातळ काप
 • एक छोटा चमचा गरम मसाला
 • एक छोटा कांदा
 • एक छोटा लिंबू
 • दहा पाकळ्या लसूण
 • अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे
 • पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
 • अर्धा चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार तेल

मोड आलेल्या मसुराचा पुलाव करण्याची पाककृती


 • तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
 • धुतलेले तांदूळ अर्धवट शिजवून घ्या.
 • दुसर्‍या पातेल्यामध्ये तेल गरम करुन त्यात हळद, वाटलेला लसूण व आलं टाका.
 • आता त्यात मोड आलेले मसूर, गरम मसाला व मीठ टाकून भरपूर पाण्यामध्ये शिजवा.
 • नंतर एका पातेल्यात अर्धवट शिजवलेला भात पसरून टाका.
 • वरुन तेल किंवा तूप टाका.
 • गरजेनुसार त्यात थोडेसे पाणी शिंपडून पातेल्यावर झाकण ठेऊन ते सर्व शिजू द्या.
 • पुलाव शिजल्यावर वाढताना त्यावर किसलेले खोबरे, गाजराचे काप व कोथिंबीर टाकून सजवा आणि लिंबूसोबत वाढा.

मोड आलेल्या मसुराचा पुलाव

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.