मोड आलेल्या कडधान्यांची भेळ - पाककृती

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, पाककला - [Mod Aalelya Kadadhanyanchi Bhel, Recipe].
मोड आलेल्या कडधान्यांची भेळ - पाककृती | Mod Aalelya Kadadhanyanchi Bhel - Recipe

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ


चटपटीत असलेला हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जाईल.मोड आलेल्या कडधान्यांची भेळ करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी चुरमुरे
 • पाव वाटी मोड आलेले मूग
 • पाव वाटी बारीक कापलेला टोमॅटो
 • अर्धा वाटी पेरुचे तुकडे
 • अर्धी वाटी शेव
 • पाव वाटी कापलेली कोथिंबीर
 • चार छोटे चमचे लिंबाचा रस
 • पाव चमचा काळे मीठ किंवा साधे मीठ

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ करण्यासाठी लागणार्‍या फोडणीचे जिन्नस


 • अर्धा चमचा जीरे
 • चिमुटभर हिंग
 • पाव छोटा चमचा हळद
 • अर्धा चमचा तेल

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ करण्याची पाककृती


 • एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये जीरे, हिंग, हळदीची फोडणी टाकून त्यात चुरमुरे मिसळा.
 • कढई खाली उतरवून त्यात काळे मीठ व शेव टाकून मिश्रण थंड करा.
 • नंतर त्यात मोड आलेले मूग, कापलेला टोमॅटो, पेरुचे तुकडे, कापलेली कोथिंबीर, लिंबाचा रस टाका.
 • चटपटीत भेळ तयार.
 • बदलत्या हंगामानुसार तुम्ही वेगवेगळी फळे भेळेत घालू शकता.

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.