मेथी व रव्याचे वडे
मेथी व रव्याचे गरमागरम वडे पुदिन्याच्या चटणीसोबत खाल्ल्यास वड्यांना छान स्वाद येतो.
मेथी व रव्याचे वडे करण्यासाठी लागणारा जिन्नस
- एक वाटी हरभर्याच्या डाळीचे पीठ
- एक वाटी मैदा
- एक मोठा चमचा भाजलेला रवा
- एक वाटी चिरलेली मेथी
- एक छोटा चमचा मेथीपूड
- एक छोटा चमचा तीळ
- चिमुटभर हिंग
- एक छोटा चमचा हळद
- तळण्यासाठी तेल
- चवीनुसार मीठ
मेथी व रव्याचे वडे करण्याची पाककृती
- डाळीचे पीठ, मैदा, भाजलेला रवा व चिरलेली मेथी एकत्र करुन त्यामध्ये मीठ, तीळ, हळद, हिंग व मेथीपूड टाका.
- दोन छोटे चमचे गरम तेल घाला.
- पीठ पाण्याने घट्ट मळा.
- त्यांची गुंडाळी करुन कुकरच्या डब्यात ठेवा.
- कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या.
- कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या.
- गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता.
मेथी व रव्याचे वडे
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला