मेथी खाकरा - पाककृती

मेथी खाकरा, पाककला - [Methi Khakhra, Recipe].
मेथी खाकरा - पाककृती | Methi Khakhra - Recipe

मेथी खाकरा


खुसखुशीत मेथीचा खाकरा घट्ट डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकतो.मेथी खाकरा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दीड वाटी गव्हाचे पीठ
 • पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने
 • एक छोटा चमचा ओवा
 • एक छोटा चमचा तीळ
 • पाव छोटा चमचा मिरची पावडर
 • पाव छोटा चमचा हळद
 • दोन चमचे तेल
 • चवीनुसार मीठ

मेथी खाकरा करण्याची पाककृती


 • मेथीच्या पानांमध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद, तेल आणि मीठ टाका.
 • सर्व साहित्य मेथीची पाने मऊ होईपर्यंत एकत्र कालवा.
 • तयार मिश्रणात गव्हाच पीठ मिसळा आणि अंदाजे पाणी घालून पीठ मळा.
 • तयार गोळा एक तास भिजू द्यावा.
 • पिठाचे छोटे गोळे करुन पातळ लाटा.
 • तवा गरम झाल्यावर तव्यावर टाकून त्यावर तेल किंवा तूप घाला.
 • मंद आचेवर खाकरा कापडाने दाब देऊन कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

मेथी खाकरा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.