मेथीचा पराठा - पाककृती

मेथीचा पराठा, पाककला - [Methicha Paratha, Recipe].
मेथीचा पराठा - पाककृती | Methicha Paratha - Recipe

मेथीचा पराठा


कडवट वाटणारी मेथीची भाजी पराठ्यातून आवडीने खाल्ली जाऊ शकते.मेथीचा पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या गव्हाचे पीठ
 • अर्धी वाटी बेसन पीठ
 • दिड वाटी बारीक चिरलेली मेथी
 • पाऊण छोटा चमचा आलं - लसूण पेस्ट
 • अर्धा छोट चमचा ओवा
 • आवश्यकतेनुसार तेल
 • आवश्यकतेनुसार मीठ
 • चवीनुसार वाटलेल्या हिरव्या किंवा लाल मिरच्या

मेथीचा पराठा करण्याची पाककृती


 • गव्हाचे पीठ, बेसन पीठ, चिरलेली मेथी, आलं - लसूण पेस्ट, वाटलेली
 • मिरची, मीठ, ओवा हे सर्व साहित्य एकत्र करा.
 • आवश्यकतेनुसार पाणी घालून ते चांगले मळून घ्या.
 • पीठाचे छोटे छोटे गोळे करुन पीठ लावून पातळ लाटा.
 • तव्यांवर भाजा व कडेने तेल सोडा.
 • पुदिना किंवा आवळ्याच्या चटणीसोबत गरम खायला द्या.

मेथीचा पराठा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.