कोथिंबीरचे वडे - पाककृती

कोथिंबीरचे वडे, पाककला - [Kothimbirche Vade, Recipe].
कोथिंबीरचे वडे - पाककृती | Kothimbirche Vade - Recipe

कोथिंबीरचे वडे


नेहमीच्या कोथिंबीरीची चव वडे केले असता वेगळीच लागेल.कोथिंबीरचे वडे करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक जुडी कोथिंबीर
 • एक वाटी भिजवलेली हरभरा डाळ
 • चवीप्रमाणे वाटलेली हिरवी मिरची
 • अर्धा छोटा चमचा जीरेपूड
 • अर्धा छोटा चमचा धणेपूड
 • अर्धा छोटा चमचा ओवा
 • चवीनुसार मीठ

कोथिंबीरचे वडे करण्याची पाककृती


 • भिजवलेली हरभर्‍याची डाळ रवाळ वाटून घ्या.
 • त्यामध्ये धणेपूड, जीरेपूड, ओवा व वाटलेली हिरवी मिरची घाला.
 • नंतर त्यात धुवून कोरडी करुन चिरलेली कोथिंबीर, मीठ व थोडेपाणी घाला.
 • मिश्रण कणकेप्रमाणे घट्ट करुन त्याच्या गोल सुरळ्या बनवा.
 • कुकरमधील पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या.
 • कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या.
 • गार झाल्यावर त्याचे काप करुन तळा किंवा फोडणीवर परता.

कोथिंबीरचे वडे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.