कोथिंबिरीची भाजी - पाककृती

कोथिंबिरीची भाजी, पाककला - [Kothimbirichi Bhaji, Recipe].
कोथिंबिरीची भाजी - पाककृती | Kothimbirichi Bhaji - Recipe

कोथिंबिरीची भाजी


जेव्हा कोथिंबीर स्वस्त असेल तेव्हा तिचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करुन आपण शरीरातील लोहाचे पोषण वाढवू शकतो.कोथिंबिरीची भाजी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या चिरलेली कोथिंबीर
 • दोन - तीन हिरव्या मिरच्या
 • पाव वाटी डाळीचे पीठ
 • चवीनुसार मीठ

कोथिंबिरीची भाजी करण्यासाठी लागणार्‍या फोडणीचा जिन्नस


 • दोन छोटे चमचे तेल
 • एक छोटा चमचा जीरे
 • एक छोटा चमचा मोहरी

कोथिंबिरीची भाजी करण्याची पाककृती


 • कोथिंबीर धुवून चिरुन कोरडी करुन घ्या.
 • एका कढईमध्ये मिरचीची फोडणी करा.
 • त्यावर कोथिंबीर घालून झाकण ठेवा.
 • कोथिंबीर मऊ झाल्यावर मीठ व हरभरा डाळीचे पीठ घाला.
 • झाकण ठेवून चांगली वाफ आल्यावर गॅस बंद करा.

कोथिंबिरीची भाजी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.