कोबी पुलाव - पाककृती

कोबी पुलाव, पाककला - [Kobi Pulao, Recipe].
कोबी पुलाव - पाककृती | Kobi Pulao - Recipe

कोबी पुलाव


वरण भाताऐवजी कधीतरी कोबी पुलाव तुम्ही बदल म्हणून खाऊ शकता.कोबी पुलाव करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या तांदूळ
 • दोन वाट्या चिरलेला कोबी
 • अर्धी वाटी मटारदाणे
 • अर्धी वाटी गाजराचे काप
 • एक छोटा चमचा गरम मसाला
 • दोन छोटे चमचे लिंबाचा रस
 • एक मोठा चमचा तेल
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • चवीपुरते मीठ

कोबी पुलाव करण्याची पाककृती


 • तांदूळ धुवून १५ मिनीटे पाण्यात तसाच ठेवा.
 • नंतर पाण्यातून बाहेर काढा व तेलावर परता.
 • त्यामध्ये कोबी, चिरलेले गाजर, मटारदाणे, गरम मसाला व पाणी घाला.
 • सर्व जिन्नस घालून व्यवस्थित परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
 • वाढताना वरून लिंबाचा रस व कोथिंबीर घालून वाढा.

कोबी पुलाव

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.