आवळ्याचे लोणचे - पाककृती

आवळ्याचे लोणचे, पाककला - [Aavalyache Lonache, Recipe].
आवळ्याचे लोणचे - पाककृती | Aavalyache Lonache - Recipe

आवळ्याचे लोणचे


ज्यांना आवळ्याचे गोड पदार्थ आवडत नाहीत ते आवळ्याचे लोणचे खाऊ शकतात.आवळ्याचे लोणचे करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक किलो मोठे पिवळसर ताजे आवळे
 • १०० ग्रॅम लोणच्याचा मसाला
 • दोन मोठे चमचे तेल
 • चवीपुरते मीठ

आवळ्याचे लोणचे करण्यासाठी लागणारे फोडणीचे जिन्नस


 • एक चमचा हळद
 • एक चमचा हिंग
 • एक चमचा मोहरीचे तेल

आवळ्याचे लोणचे करण्याची पाककृती


 • आवळे धुवून पुसून बारीक फोडी करा.
 • आवळ्यातील बी काढून टाका.
 • आता त्याला हळद, मीठ लावून ठेवा.
 • दुसर्‍या दिवशी लोणच्याचा तयार मसाला आवश्यकतेनुसार घालून कालवा.
 • हिंग, मोहरीच्या तेलाची फोडणी करा.
 • फोडणी थंड झाल्यावर ती मुरलेल्या आवळ्यात घाला.
 • तयार आहे आवळ्याचे लोणचे.
 • आवळ्याचे लोणचे पंधरा दिवस चांगले रहाते.
 • आवळ्याचे लोणचे करण्यासाठी बारीक आवळे पण चालतात.

आवळ्याचे लोणचे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.