अळूची पातळ भाजी - पाककृती

अळूची पातळ भाजी, पाककला - [Aluchi Patal Bhaji, Recipe].
अळूची पातळ भाजी - पाककृती | Aluchi Patal Bhaji - Recipe

अळूची पातळ भाजी


अळू, हरभरा, गूळ या लोहयुक्त पदार्थांमुळे अळूची पातळ भाजी अतिशय पौष्टिक असते.अळूची पातळ भाजी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • पाच वाट्या चिरलेली अळूची पाने
 • पाव वाटी भिजवलेली हरभर्‍याची डाळ
 • दोन छोटे चमचे गूळ
 • एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
 • एक मोठा चमचा बेसन पीठ
 • एक चिमूटभर हिंग
 • अर्धा छोटा चमचा हळद
 • एक इंच आले, अर्धी वाटी नारळ, तीन हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर यांचे एकत्र मिश्रण

फोडणीसाठी लागणारा जिन्नस


 • एक छोटा चमचा तेल
 • अर्धा छोटा चमचा जीरे
 • अर्धा छोटा चमचा मोहरी
 • चिमुटभर हिंग

अळूची पातळ भाजी करण्याची पाककृती


 • एका कढईत तेल गरम करुन त्यात हिंग, कापलेली अळूची पाने, भिजवलेली डाळ आणि शेंगदाणे टाकून दोन मिनिटे परता.
 • त्यात हळद, चिंचेचा कोळ, एक वाटी पाणी, गूळ आणि मीठ टाका.
 • डाळ शिजेपर्यंत मिश्रण परता.
 • नंतर त्यात वाटलेले खोबरे, मिरच्या व कोथिंबीरीचे मिश्रण घाला.
 • अर्धी वाटी पाण्यात बेसनपीठ मिसळा व ते शिजलेल्या भाजीत टाका.
 • एका दुसर्‍या कढईत तेल, मोहरी, जीरे, हिंगाची फोडणी करा.
 • तयार फोडणी भाजीवर टाका व मिश्रण थोडे हलवा.
 • तयार आहे अळूची पातळ भाजी.

अळूची पातळ भाजी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.