कोबी व मूगडाळीची कोशिंबीर - पाककृती

कोबी व मूगडाळीची कोशिंबीर, पाककला - [Kobi Va Mugdalichi Koshimbir, Recipe].
कोबी व मूगडाळीची कोशिंबीर - पाककृती | Kobi Va Mugdalichi Koshimbir - Recipe

कोबी व मूगडाळीची कोशिंबीर


किसलेला नारळ घातल्यामुळे कोबी व मूगडाळीची कोशिंबीर रुचकर लागते.कोबी व मूगडाळीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या कापलेला कोबी
 • अर्धी वाटी भिजवलेली मूगडाळ
 • एक कापलेली मिरची
 • तीन मोठे चमचे कोथिंबीर
 • एक मोठा चमचा किसलेले ओले खोबरे
 • एक छोटा चमचा लिंबाचा रस
 • एक छोटा चमचा साखर
 • चवीनुसार मीठ

फोडणीसाठी लागणारा जिन्नस


 • दोन छोटे चमचे तेल
 • पाव चमचा हळद
 • चिमूटभर हिंग
 • २ - ३ कडीपत्त्याची पाने

कोबी व मूगडाळीची कोशिंबीर करण्याची पाककृती


 • भिजवलेल्या मूगडाळीमधील पाणी काढून टाका.
 • आता त्यात कापलेला कोबी मिसळा.
 • एका छोट्या पातेल्यात तेल, मिरची, हिंग, कडिपत्त्याची पाने टाकून फोडणी करा.
 • तयार फोडणी कोबी व डाळीच्या मिश्रणात ओता.
 • तयार मिश्रणात कोथिंबीर, साखर, मीठ, किसलेले ओले खोबरे आणि
 • लिंबाचा रस मिसळून एकत्र करा.
 • तयार आहे कोबी व मूगडाळीची कोशिंबीर.

कोबी व मूगडाळीची कोशिंबीर

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.