आवळ्याचा छुंदा - पाककृती

आवळ्याचा छुंदा, पाककला - [Aavalyacha Chunda, Recipe].
आवळ्याचा छुंदा - पाककृती | Aavalyacha Chunda - Recipe

आवळ्याचा छुंदा


भरपूर ‘क’ जीवनसत्व असलेला आवळ्याचा छुंदा तुम्ही मुगाची खिचडी, थालीपीठ यांसारख्या अनेक पदार्थांबरोबर खाऊ शकतो.आवळ्याचा छुंदा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक किलो मोठे आवळे
 • अर्धी वाटी किसलेले आले
 • दिड किलो साखर
 • एक ग्लास पाणी

आवळ्याचा छुंदा करण्याची पाककृती


 • आवळे धुवून पुसून किसणीने किसा.
 • आल्याची साल काढून किसणीने किसून वेगळे ठेवा.
 • साखर पाण्यात भिजत ठेवा व नंतर मंद गॅसवर तापवून त्याचा पाक करा.
 • पाक पातळ असतानाच त्यात आवळ्याचा कीस टाका.
 • मोठ्या पळीने किंवा चमच्याने एकसारखे घोटत रहा.
 • आवळ्याचा कीस शिजल्यावर त्यातच आल्याचा कीस टाकून परत थोडा वेळ हलवा.
 • नंतर गॅस बंद करुन हे मिश्रण रात्रभर थंड होऊ द्या.
 • दुसर्‍या दिवशी परत एकदा गॅसवर मिश्रण आटवा.
 • आटवून घट्ट झालेले मिश्रण थंड झाल्यावर बरणीत भरा.

आवळ्याचा छुंदा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.