Loading ...
/* Dont copy */

कोरोनाने दाखवलेला उत्पन्नाचा एक मार्ग

कोरोनाने दाखवलेला उत्पन्नाचा एक मार्ग.

कोरोनाने दाखवलेला उत्पन्नाचा एक मार्ग

कोरोना संकटाची झळ..


संजय आणि राजन आपापसात बोलत होते. बोलत काय एकमेकांचे सांत्वनच करत होते म्हणा ना. का नाही करणार? समदुःखी ते. कोरोना संकटाची झळ यांनाही लागलेली.दोघांपैकी कोणाला या आजाराची लागण तर नाही पण या आजारामुळे उद्भवलेल्या न भूतो परिस्थितीचे चटके जरूर बसले होते. संजयची नोकरी गेली होती तर राजन चा मागील चार महिन्यांचा पगार खोळंबला होता.



जशी गरज ही शोधाची जननी असते त्याच तत्वाने दोघेही उत्पनाची नवी साधने शोधत होते.संजय बोलत होता,"राजन ,अरे तुला माहित आहे का? आपणासाठी उत्पन्नाची अडचण आहे पण तशी सगळ्यांसाठी नाही रे, माझा मित्र सुरेश,त्याला चांगला मार्ग सापडला आहे." राजन अगदी कानात प्राण आणून ऐकत होता.अगदीच अधीर होत त्याने संजयला प्रश्न केला,"कोणता, कोणता रे कोणता मार्ग ? "संजय पुढे बोलू लागला," अरे शेअर मार्केटचा,काय सांगू तुला,माझा मित्र सुरेश शेअर मार्केटमधून भरपूर पैसा कमावतो आहे,तूच बघ ना कोविडमुळे सर्व बंद झाले पण शेअर मार्केट चालूच राहिले,आपण पण आपली सेव्हिंग,जमापुंजी येथे वापरून पैसे कमवायचे का रे?"

कोविड काळात बऱ्याचजणांना पडलेला हा प्रश्न, संजय काही एकटा नाही.पण खरंच हे शक्य आहे का? SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India जिची शेअर बाजारात काही गैर तर घडत नाही ना यावर नजर असते, त्यांनी जाहीर केल्यानुसार शेअर बाजारात व्यवहाराकरिता आवश्यक DMAT अकाउंट हे कोविड काळात सर्वाधिक उघडले गेले आहेत. बाजारात येणारे हे नवीन गुंतवणूकदार बहुतांशी रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्न घेऊन आलेले किंवा उपजीविकेचे साधन शोधणारे किंवा गाजराची पुंगी वाजली तर वाजली म्हणत नशीब आजमावण्यासाठी आलेले दिसतात. परंतु स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर शेअर बाजार हा या तिघांपैकी कोणासाठीही नाही आणि तरीही या पैकी एखाद्या विचाराने आपण येथे येत आहेत तर हात पोळल्याशिवाय कसे बरे राहतील?

जर असे असेल तर शेअर बाजार आहे तरी कोणासाठी? सामान्य माणसाने यात येऊच नये का? नाही,असे बिलकुल नाही, पण बाजाराकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे तो योग्य असेल तरच यात प्रवेश करणे उचित ठरेल. आता हा योग्य म्हणजे कसा? मुळात शेअर बाजार हे पैसे देणारे यंत्र आहे ही भावना नसावी.आपण शिकण्यासाठी तयार आहोत का?हा प्रश्न प्रत्येक नव्या गुंतवणूकदाराने स्वतःला विचारला पाहिजे.याचे उत्तर हो असेल तर पुढचे पाऊल टाकावे.आपण जी काही नोकरी किंवा व्यवसाय करतो त्यासाठी आपण १५ ते २० वर्ष शिक्षण घेतो त्यानंतर मिळकत सुरु होते मात्र शेअर बाजाराकडून आपण अगदी काही दिवसात श्रीमंत होण्याची अपेक्षा बाळगतो, हे कसे शक्य होईल? जगातील श्रेष्ठ गुंतवणूकदार वॉरेन बफे ज्यांचे आज वय ९० पेक्षा जास्त आहे त्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९% संपत्ती वयाच्या ५० वर्षांनंतर कमावली.पण आपल्यापैकी बरेच गुंतवणूकदार रातोरात श्रीमंत होण्याचे विचार बाळगत असतील तर ते चुकीचेच म्हणावे लागेल.

मग हा बाजार नशीबाचा खेळ आहे का? तर तसे ही नाही.अभ्यासाबरोबरच बाजाराकडे पाहताना आपण व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे.मग व्यवसायात नफा आणि नुकसान दोन्ही आलेच.आपण आहोत का नुकसान सहन करायला तयार? तर तुमचे बाजारात स्वागतच आहे.आपण यशस्वी कधी होऊ? जेव्हा नुकसान कमी आणि नफा जास्त तेव्हा! तर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी या मानसिकतेची गरज आहे.

त्यामुळे संजय आणि राजन यांची शेअर बाजाराकडे येण्यापूर्वी योग्य मानसिकता असेल,अभ्यास करण्याची तयारी असेल आणि बाजाराला आवश्यक तो वेळ देता येणार असेल तर आणि तरच येथून कधीही न संपणारी संपत्ती ते निर्माण करू शकतात.

- सुशील दळवी
शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी १२ वर्षांहून अधिक काळ संलग्न असून प्रशिक्षक.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची