गहू बेसन लाडू - पाककृती

गहू बेसन लाडू, पाककला - [Gahu Besan Ladoo, Recipe] खमंग, रूचकर असा गहू बेसन लाडू सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये एक छान पर्याय आहे.
गहू बेसन लाडू - पाककृती | Gahu Besan Ladoo - Recipe

सणासुदीला केला जाणारा एक पौष्टीक लाडूचा खमंग आणि रूचकर प्रकार


गहू बेसन लाडू - खमंग, रूचकर असा गहू बेसन लाडू सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये एक छान पर्याय आहे; शिवाय सणासुदीला एक पौष्टीक पदार्थ म्हणून देखील गहू बेसन लाडू केला जाऊ शकतो.गहू बेसन लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • दोन वाट्या गहू
  • अर्धी वाटी हरभरा डाळ
  • अर्धी वाटी मूगडाळ
  • अडीच वाट्या गूळ
  • एक वाटी तूप

गहू बेसन लाडू करण्याची पाककृती


  • गहू व डाळी मंद आचेवर तांबूस रंगावर वेगवेगळ्या भाजून घ्या.
  • गार झाल्यावर सर्व एकत्र करुन रवाळ पीठ दळून आणा.
  • कढईत तूप वितळेपर्यंत गरम करा.
  • तूपात गूळ बारीक करुन टाका व चांगला विरघळून घ्या.
  • त्यात पीठ घालून हे मिश्रण चांगले एकत्र करा व त्याचे लगेच लाडू वळा.

गहू बेसन लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.