गूळ पापडी - पाककृती

गूळ पापडी, पाककला - [Gul Papdi, Recipe] बऱ्याच दिवस टिकणारी गूळ पापडी मधल्या वेळेस भूक लागल्यावर मुलांना द्यायला एक उत्तम पौष्टीक पर्याय आहे.
गूळ पापडी - पाककृती | Gul Papdi - Recipe

गूळ पापडी म्हणजे मधल्या वेळेस भूक लागल्यावर मुलांना द्यायला एक उत्तम पौष्टीक पर्याय


गूळ पापडी - बऱ्याच दिवस टिकणारी गूळ पापडी मधल्या वेळेस भूक लागल्यावर मुलांना द्यायला एक उत्तम पौष्टीक पर्याय आहे.गूळ पापडी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी गव्हाचे पीठ
 • पाऊण वाटी गूळ
 • एक छोटा चमचा खसखस
 • पाव चमचा वेलची पावडर
 • एक चमचा किसलेले खोबरे
 • अर्धी वाटी तूप

गूळ पापडी करण्याची पाककृती


 • प्रथम खसखस थोडे तूप लावलेल्या एका ताटावर सारख्या प्रमाणात पसरवून ठेवा.
 • तयार ताट बाजूला ठेवा.
 • नंतर एका कढईत तूप टाकून त्यावर गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
 • कढई गॅसवरून खाली उतरवा.
 • कढईमध्ये किसलेला गूळ, वेलची पावडर व खोबरे घालून मिश्रण चांगले मिसळा.
 • गूळ वितळल्यावर व मिश्रण गरम असताना खसखस टाकलेल्या ताटामध्ये मिश्रण ओता व मिश्रण सगळीकडे सारखे पसरवा.
 • गरम असतानाच त्याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा.
 • थंड झाल्यावर डब्यात भरुन ठेवा.
 • गूळ पापडी १० ते १५ दिवस खराब होत नाहीत.

गूळ पापडी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.